breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: बेळगाव जिल्ह्यात आढळले ३० कोरोनाबाधित रुग्ण; सर्वजण अजमेरचे प्रवाशी

करोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या बेळगाव जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी ३० रुग्ण आढळले. यापूर्वी बेळगाव जिल्ह्यात अनेक करोना रुग्णांचा इतिहास हा तबलीगींशी जुळला होता. पण आज आढळलेले रुग्ण हे राजस्थानमधील अजमेर येथील आहेत. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील २२ जणांचा समावेश असून बागलकोट, बदामी जिल्ह्यातील आठ जणांचा समावेश आहे. राजस्थानातील अजमेर येथे कर्नाटकातील काही भाविक आबालवृद्ध भाविक गेले होते. टाळेबंदीमुळे ते राजस्थानमध्ये अडकून पडले होते.

दोन दिवसापूर्वी ते बेळगाव जिल्ह्याच्या प्रवेश ठिकाण असलेल्या कोगनोळी टोल नाका येथे आले होते. त्यांनी बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण कर्नाटक शासनाची विशेष परवानगी असल्याशिवाय कोणालाही आत राज्यात प्रवेश दिला जात नाही. या प्रवाशांनी बेळगावातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रवेश केल्यानंतर त्यांना निपाणी जवळील मोरारजी वस्तीशाळा येथे ठेवण्यात आले. त्यांची आरोग्य तपासणी केली असता बेळगाव जिल्ह्यातील २२ जणांना तर बदामी व बागलकोट जिल्ह्यातील आठ जणांना अशा ३० जणांना करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना बेळगाव येथील करोना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button