breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: ‘बीकेसी’मध्ये आणखी एक हजार खाटांचे कोविड रुग्णालय

मुंबई : शहरातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत आणखी एक हजार खाटांची सुविधा असलेले कोविड रुग्णालय तयार करण्यात येणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावर उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयात गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची, तसेच अतिदक्षता विभागाची सुविधादेखील असेल.

ज्या रुग्णांना अलगीकरण आणि विलगीकरणाची गरज आहे, तसेच अत्यवस्थ नसणारे रुग्ण अशांसाठी एमएमआरडीएमार्फत नुकतीच पहिल्या टप्प्यातील एक हजार खाटांची सुविधा तयार करण्यात आली. केवळ पंधरा दिवसांत उभारलेल्या या सुविधेचे दोन दिवसांपूर्वीच पालिकेस हस्तांतर करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील या सुविधेच्या जवळच आता दुसऱ्या टप्प्यातील आणखी एक हजार खाटांचे रुग्णालयाचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील या रुग्णालयात एक हजार खाटांपैकी १०० खाटांचा अतिदक्षता विभाग असेल. तर उर्वरित ९०० खाटांपैकी काही ठिकाणी ऑक्सिजनपुरवठा यंत्रणादेखील असेल. तसेच या रुग्णालयात गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्याची सुविधादेखील असेल असे एमएमआरडीएने सांगितले.

या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालयाचे प्राथमिक टप्प्यातील काम सुरू झाले असून यासाठी पहिल्या रुग्णालयाप्रमाणेच सामग्रीचा वापर के ला जाईल. अग्निप्रतिबंधक सामग्रीचा वापर, पावसाळ्यातदेखील टिकून राहणारी अशी ही सुविधा असेल असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button