breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

#CoronaVirus | परराज्यात अडकलेल्यांच्या घरवापसीला केंद्र सरकारची सशर्त परवानगी

नवी दिल्ली | कोरोना लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्यांना आपल्या राज्यात पुन्हा पाठवायला केंद्र सरकारने सशर्त परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहखात्याने परराज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि यात्रेकरूंना त्यांच्या राज्यात जायला परवानगी देण्यात आली आहे, पण याबाबत गृहखात्याने काही अटी ठेवल्या आहेत.

परराज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची मागणी गेले कित्येक दिवस अनेक राज्यांकडून होत होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये हा मुद्दा उचलून धरला होता.

महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातल्या मजुरांसाठी रेल्वेने स्पेशल ट्रेन सोडावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीत केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button