breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#CoronaVirus: नवी मुंबईत चार महिन्यांनी सुरु केलेले मॉल, एकाच दिवसात बंद

नवी मुंबई : राज्य सरकारने राज्यातील सर्व मॉल 5 ऑगस्टपासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी सरकारकडून नियमावलीदेखील जारी करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या परवानगीनुसार राज्यासह नवी मुंबईतही कालपासून (5 ऑगस्ट) मॉल सुरु झाले. मात्र, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी 5 ऑगस्टपासून सुरु झालेले मॉल बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. महापालिका आयुक्तांच्या आदेशामुळे काल सुरु झालेले मॉल आजपासून पुन्हा बंद झालेले आहेत.

कोरोनामुळे नवी मुंबईत पुन्हा एकदा ग्राहकांच्या आनंदावर विरजण पडलेले आहे. नवी मुंबई शहरात कोपरखैरणे, वाशी, नेरुळ आणि सिवूडस भागातील मॉल पुन्हा खुले करण्यात आले होते. ग्राहकांनी मॉलमध्ये यावं यासाठी काही आकर्षक भेटवस्तूदेखील ग्राहकांना दिल्या गेल्या आहेत. सिवूडस येथील एका मॉलमध्ये तर पहिल्याच दिवशी तब्बल साडेतीन हजार ग्राहकांनी भेट दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button