breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: धक्कादायक! कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा संसर्गाचा धोका, 4 महिन्यांनंतर महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

अहमदाबाद: जगभरात कोरोनाचा विस्फोट होत आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे रिकव्हरी रेट वाढलेल्या देशात आता कोरोनानं आणखी एक वेगळं रुप घेतलेलं आहे. एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतर पुन्हा संसर्गाचा धोका त्या व्यक्तीला होऊ शकतो की नाही याबाबत सध्या अनेक निरीक्षणं सुरू देखील आहेत. गुजरातमधील अहमदाबाद इथे 54 वर्षीय महिलेला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचा चिंताजनक प्रकार समोर आलेला आहे.

23 ऑगस्टला घेण्यात आलेल्या स्वॅबमध्ये या महिलेचा दुसऱ्यांदा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. हाँगकाँग, नेदरलँड आणि बेल्झियम नंतर आता भारताचाही नंबर लागलेला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यानंतर काही दिवसांनी अथवा महिन्यांनी पुन्हा संसर्ग होऊ शकतो अशी घटना समोर आलेली आहे. याचं प्रमाण आता कमी असलं तरीही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button