breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: देशभरात २४ तासात १६८४ नवे कोरोना रुग्ण, संख्या २३ हजारांच्याही पुढे

देशभरात २४ तासात १६८४ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारतातील करोना रुग्णांची संख्या २३ हजार ७७ इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मागील २८ दिवसात देशातल्या १५ जिल्ह्यांमध्ये एकही नवा करोना रुग्ण आढळलेला नाही. तर ८० जिल्हे असे आहेत जिथे मागील १४ दिवसांपासून एकही नवा रुग्ण आढळला नाही असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

केंद्र सरकारने दिलेले निर्देश हे लॉकडाउनच्या काळात योग्य पद्धतीने पाठवले गेले पाहिजेत. ज्यामुळे आर्थिक चक्र रुळावर येण्यासाठी हळूहळू मदत होईल असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढते आहे तिथे जास्त लक्ष केंद्रीत करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. करोना हा इतर साथीच्या रोगांसारखाच बरा होणारा आजार आहे. मात्र याचा रुग्ण त्वरित लक्षात येणं आवश्यक आहे असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button