breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

#CoronaVirus: दिलासादायक! दोन दिवसांत नोंदवली जाणार जगातली पहिली कोरोना विषाणू वरची लस

मॉस्को: जगभरात सध्या 1 कोटी 97 लाख कोरोनाबाधित रुग्ण सापडलेले आहेत. थोड्याच दिवसात हा आकडा 2 कोटी होऊ शकतो. मात्र अद्यापही कोरोनावर लस मिळालेली नाहीये आहे. जगभरातील सर्वच देश कोरोनाची लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगभरात 21 हून अधिक लशीच्या क्लिनिकल ट्रायल केल्या जात आहेत. एकीकडे जगभरातील तज्ज्ञ त्यांच्या लशीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात आहेत, तर रशियाने ही लस तयार असल्याचा दावा केलेला आहे. 2 दिवसांनंतर म्हणजे 12 ऑगस्ट रोजी या लशीची अधिकृत नोंदणी होणार असल्याचे वृत्त आहे.

रशियानं केलेला दावा खरा असेल तर ही लस जगातील पहिली कोरोना लस असणार आहे. रशियामध्ये कोरोनाची लस ही रशियन आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेनं तयार केलेली आहे. रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांची लस चाचणीत यशस्वी झाली तर ऑक्टोबरपासून देशात मोठ्या प्रमाणात उत्पादनही सुरू होईल. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने देशातील नागरिकांना दिलासा दिलेला आणि म्हटले की या लसीकरणाच्या मोहिमेतील सर्व खर्च सरकार करणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button