breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: जिगरबाज महाराष्ट्र पोलीस! ४८ तासांत एकाही पोलिसाला कोरोनाची लागण नाही

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यापासून महाराष्ट्र पोलीस दिवस-रात्र रस्त्यांवर तसंच ठिकठिकाणी कडक पहारा देत नियमांचं योग्य पालन व्हावं याची खबरदारी घेत आहे. मात्र लोकांनी घरात थांबावं यासाठी रस्त्यांवर जीव धोक्यात घालून बंदोबस्त करणाऱ्या पोलीस दलातील अनेक योद्ध्यांनाच करोनाची लागण झाली आहे. यामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण अशा परिस्थितीत एक चांगली बातमी आली असून गेल्या ४८ तासात एकाही पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ४८ तासात एकाही पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची लागण झालेली नाही. आतापर्यंत २५६२ पोलिसांना करोनाची लागण झालेली असून ३४ जणांच्या मृत्यूची नोंद आहे.

करोनामुळे एकीकडे लोकांसोबत पोलीस कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण असताना ही बातमी नक्कीच पोलीस खात्याला आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी आहे.

महाराष्ट्राने ओलांडला ९० हजारांचा टप्पा
महाराष्ट्रात मंगळवारी २२५९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ९० हजार ७८७ झाली आहे. आत्तापर्यंत ४२ हजार ६३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४४ हजार८४९ रुग्ण सध्याच्या घडीला अॅक्टिव्ह आहेत. आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या ३ हजार २८९ झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button