breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

#CoronaVirus: खासगी बँकांचा ग्राहकांना मोठा दिलासा,ग्राहकांच्या कर्जावरील EMI वर 3 महिन्यांपर्यंत स्थगिती

आरबीआयच्या आवाहनानंतर सरकारी बँकांबरोबर आता खासगी बँकांनीही आपल्या ग्राहकांच्या कर्जावरील ईएमआय तीन महिन्यांपर्यंत स्थगित केले आहेत. सरकारी बँकांचा हा निर्णय नक्कीच दिलासादायक आहे… तर खासगी बँका या सुविधा ‘ऑन डिमांड’ म्हणजे मागणीनुसार देत आहेत. म्हणजेच मॉरेटियमचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना आपल्या बँकांना ई-मेल करुन या सुविधेचा लाभ घेऊ इच्छित असल्याचे सांगावे लागेल. तर आयसीआयसीआय बँकही काही कर्जांवर सवलत देणार आहे. यावर त्यांचं काम सुरु आहे. आयडीबीआयकडून याप्रकरणी थोडासा दिलासा देण्यात आला आहे. आयडीएफसीच्या ग्राहकांना ई-मेल करुन याची मागणी करावी लागेल. 

बँक ऑफ बडोदाने १ मार्च, २०२० पासून ३१ मे २०२० दरम्यान येणारे कॉर्पोरेट, एमएसएमई, कृषी, रिटेल, गृह, वाहन, वैयक्तिक कर्जासह इतर सर्व कर्जांच्या हफ्ते तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. तर यूनियन बँकेनेही तीन महिन्यांचे हप्ते/व्याज तीन महिन्यांसाठी पुढे ढकलला आहे. तेही १ मार्च २०२० ते ३१ मे २०२० दरम्यानही सुविधा देणार आहेत. 

पंजाब नॅशनल बँकेने टि्वट करुन म्हटले की, कोरोना विषाणूमुळे १ मार्च २०२० ते ३१ मे २०२० पर्यंतचे सर्व मुदत कर्जाचे सर्व हप्ते आणि रोख कर्ज सुविधेवर व्याज न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तर स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, १ मार्च २०२० ते ३१ मे २०२० पर्यंतचे ईएमआय स्थगित करण्याचा बँकेने निर्णय घेण्यात आला आहे. तर याच कालावधीत वर्किंग कॅपिटल सुविधेवरील व्याज ३० जून २०२० पर्यंत टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button