breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: कोरोनाबाबत पुणे शहरातून चिंताजनक आकडेवारी, तर ग्रामीण भागात दिलासा

पुणे: पुणे जिल्ह्यात काल (सोमवारी) दिवसभरात 2601 कोरोना रूग्णांची उच्चांकी वाढ झाली आहे. तर 44 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरासह जिल्हाभरातील कोरोना रूग्णांचा आकडा 54 हजारांवर पोहचला आहे. पुणे शहरात 1690 तर पिंपरी चिंचवडमध्ये 657 रूग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागातही 171 रूग्णांची वाढ झाली आहे. रुग्णवाढीसोबतच पुणे शहरातून एक चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजाराहून अधिक झालेली आहे. मात्र त्याचवेळी कालच्या आकडेवारीतून पुणे ग्रामीणला एक दिलासा मिळाला आहे. पुणे ग्रामीण भागात काल एकही मृत्यू झाला नाही. तसंच पुणे ग्रामीणचा आत्तापर्यंतचा मृत्यू दरही 1.78 टक्के इतका कमी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button