breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus : कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यूआधी गोंधळ, पाकिस्तानमध्ये खळबळ

कराची | पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसमुळे झालेल्या पहिल्या मृत्यूबाबत आणि त्या दरम्यानच्या बेजबाबदार कारभाराबाबत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पाकिस्तानमध्ये कोरोना रुग्णाच्या तपासणीपासून त्याच्या उपचारापर्यंत अक्षम्य निष्काळजीपणा केल्याचं उघड झालं आहे. पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनेनेच हा प्रकार उघड केला. कोरोना रुग्णांने आपल्या घरी जाऊन जोरदार पार्टीही केली आणि आपल्या अनेक नातेवाईकांची गळाभेटही घेतली. यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली.

एक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पहिल्या रुग्णाने रुग्णालयात विलीगिकरण कक्षात राहण्यास नकार दिला होता. मृत रुग्णाचं नाव सादात खान असं आहे. विशेष म्हणजे संबंधित रुग्णाने विलिगीकरण कक्षात राहण्यास नकार दिला आणि घरी जाऊ देण्याची मागणी केली. त्यानंतर पाकिस्तानमधील संबंधित रुग्णालय प्रशासनाने त्याला घरी जाण्याची परवानगी दिली. अशा पद्धतीने कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाला घरी जाण्याची परवानगी देणे नियमांच्या विरोधात होतं. तसेच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आणि धोकादायक बाब होती.

पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सादात खान 9 मार्चला सौदी अरबमधील जेद्दा येथून पेशावर विमानतळावर आला होता. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र देखील होते. खान घरी पोहचताच त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांसाठी पार्टी आयोजित केली. यात गावातील सर्व लोकही सहभागी झाले. यावेळी परंपरेनुसार अगदी संबंधित कोरोना रुग्णाची उपस्थितांनी गळाभेटही घेतली. सादात खानसोबत जेद्दा येथू परत आलेले मित्र आलमजेब यांनी सांगितलं की विमानतळावर कुणीही त्यांची कोणतीही तपासणी केली नाही. कोरोना संसर्ग झालेल्या सादात खान यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तान आरोग्य खात्यात चांगलीच खळबळ माजली आहे. मरदानची यूनियन काऊंन्सिल मंगाहमध्ये लॉकडाऊन करण्यात आली आहे. त्यामुळे या भागात कुणीही येऊ शकत नाही किंवा बाहेरही जाऊ शकणार नाही. यानंतर मृत सादात यांच्या मित्रांची कसून चौकशी केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button