breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: कोरोनाचा उद्रेक झालेल्या पुण्यात पहिला पोलीस बळी
पुणे शहरातल्या मध्य भागातील एका पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस फौजदाराचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. करोनामुळं एखाद्या पोलिसाचा मृत्यू होण्याची पुण्यातील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी मुंबईत करोनामुळं चार पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.