breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
#CoronaVirus: औरंगाबाद जिल्ह्यात 30 नव्या कोरोना बाधितांची नोंद, एकूण रुग्ण संख्या 1360 वर
राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबादमध्येही करोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. यामुळे अगोदरच रेड झोनमध्ये समावेश असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण संख्या 1360 एवढी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
— District Information office, Aurangabad (@InfoAurangabad) May 27, 2020
सविस्तर वृत्त: https://t.co/TJeq8LfFrd@InfoMarathwada pic.twitter.com/uKrLPpL5m8
औरंगाबाद जिल्ह्यात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकुण संख्या 1360 झाली असल्याची जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे. आज आढळलेल्या 30 रुग्णांमध्ये 9 महिला व 21 पुरुषांचा समावेश आहे.