breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus |अमेरिकेत सलग दुसऱ्या दिवशी तब्बल २००० लोकांचा मृत्यू

वॉशिंग्टन | कोरोना व्हायरसचा वेगाने फैलाव होत असलेल्या अमेरिकेत सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे जवळपास २००० अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेतील एकूण मृतांचा आकडा आता १४,६९५ वर जाऊन पोहोचला आहे.

मंगळवारी कोरोनामुळे १९३९ अमेरिकन नागरिक मृत्युमुखी पडले होते. तर बुधवारी हा आकडा १९७३ वर जाऊन पोहोचला. अमेरिकेतील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र असलेल्या न्यूयॉर्कमध्ये बुधवारी ७७९ लोकांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे एकाच दिवसात इतक्या लोकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्रयू कुओमो यांनी म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button