breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रराजकारण

#CoronaVirus: शरद पवारांचा आज सातारा दौरा, उदयनराजे पहिल्यांदाच बैठकीला येणार?

सातारा: राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आज (9 ऑगस्ट) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता कराडमध्ये राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना आढावा बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाऊन हॉलमध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा घेतला जाणार आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीत कोरोनासह सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पूर परिस्थितीचाही आढावा घेतला जाणार आहे. संभाव्य पाऊस, धरणसाठा, स्थलांतर सुरु असलेल्या नागरिकांसाठीच्या उपाययोजनांचाही आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य इ. या सर्वांना निमंत्रित करण्यात आलेले आहे.

शरद पवारांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बैठकीला खासदार छत्रपती उदयनराजे हे देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. यापूर्वी सातारा जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीला उदयनराजे उपस्थित राहिलेले नव्हते. खासदार झाल्यानंतर उदयनराजे या बैठकीला हजेरी लावतात की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष वेधलेले आहे. उदयनराजे यांनी हजेरी लावली, तर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरची त्यांची शरद पवार यांच्यासोबतची ही पहिलीच बैठक ठरणार आहे. यापूर्वी आढावा बैठकीत आमदार शिवेंद्रराजे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेऊन अनेक मागण्या केलेल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button