breaking-newsराष्ट्रिय

#CoronaVirus:२४ तासांत देशभरात कोरोनाचे ९३०४ नवे रुग्ण,

नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ९३०४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २६० लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी  वाढ आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा दोन लाखांच्या पुढे गेला आहे. सध्याच्या घडीला देशात कोरोनाचे एकूण २,१६,९१९ रुग्ण आहेत. यापैकी १, ०६, १३७ रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत १,०४, १०७ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. हा आकडा असाच वाढत राहिल्यास कोरोना रुग्णांची संख्या दररोज १० हजाराने वाढण्याची शक्यता आहे. देशात ३० जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर ११० दिवसांनी देशातील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखांवर पोहोचली. मात्र, त्यानंतरच्या १५ दिवसांतच या संख्येत आणखी एक लाख रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोरील चिंता वाढली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button