breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus:बापरे! लॉकडाउन असूनही प्रियकराशी लग्न करण्यासाठी ६० किमी चालत आली प्रेयसी

आंध्रप्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यातील ही घटना आहे. हनुमान जंक्शन या ठिकाणी चितिकला भवानी ही १९ वर्षीय मुलगी राहते. तिच्या घरापासून ६० किमी अंतरावर तिचा प्रियकर साई पुन्नैय्या राहतो. साई पुन्नैय्या हा एदिपल्ली गावातला रहिवासी आहे. भवानी आणि साई यांचं मागील चार वर्षांपासून एकमेकांवर प्रेम आहे. आपल्या नात्याबद्दल या दोघांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या घरी सांगितलं. मात्र दोघांच्या कुटुंबीयांना हे नातं मान्य नाही. भवानीच्या कुटुंबीयांनी तर लग्नाला नकार दिला.

त्यानंतर या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी तशी योजनाही आखली. मात्र करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने देशात लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे हे दोघे आपल्या घरांमध्येच अडकले. मात्र लॉकडाउनचे काही दिवस झाल्यानंतर भवानीने साईच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. ती ६० किमीची पायपीट करत साईच्या घरी पोहचली. या दोघांनी लग्नही केलं

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button