breaking-newsपुणे

#CoronaVirus:पुण्यात नव्या लॅबसाठी परवानगी द्या, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : “पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता चाचण्या वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकारने नवीन प्रयोगशाळांना मान्यता द्यावी”, अशी विनंती विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

“देशभरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. त्यावर मात करण्यासाठी संपूर्ण राज्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पुणे शहरात काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे महापालिकेकडून सध्या स्वॅब कलेक्शन मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलं आहे. त्यावर पुढील प्रक्रिया होण्यास बराच कालावधी लागत असल्याने संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही”, असं फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.

“कोरोना विषाणूसंबंधी स्वॅब टेस्टिंगची क्षमता वाढवण्याबाबत पुणे महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याच्या मान्यतेसाठी त्यांनी विनंती केली आहे. तरीही याबाबत लवकर निर्देश द्यावे”, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीदेखील याबाबत उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलणं झालं आहे, अशी माहिती समोर आली आहे.

“स्वॅब नमुने तपासणी प्रलंबित असल्याने सॅम्पलचा अहवाल तीन दिवसांनी मिळतो. त्यामुळे क्वारंटाईन सेंटरमधून संसर्गाचा धोका वाढण्याची भीती आहे. रिझल्ट अव्हेटेड असलेल्यांची संख्या वाढलेली आहे. यापैकी कोरोनाबाधित नागरिकांमुळे संक्रमण झपाट्याने वाढण्याची भीती आहे. सॅम्पल प्रलंबित राहिल्याने दुसरीकडे नवे सॅम्पल घेण्याची प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह असणारे नागरिक समाजात वावरण्याची शक्यता आहे”, अशी भीती महापौरांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button