breaking-newsराष्ट्रिय

#CoronaVirus:दिल्लीत कोरोना रुग्ण वाढीचा वेग मुंबईपेक्षा वाढला

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यापासून कोरोना विषाणूमुळे सर्वात जास्त प्रभावित शहर म्हणून दिल्लीने मुंबईला मागे टाकले आहे. 12 जूनपासून दिल्लीत दररोज 2 हजाराहून अधिक रुग्ण वाढत आहेत. 18 जून रोजी दिल्ली आणि चेन्नई या दोन्ही शहरांमध्ये मुंबईपेक्षा अधिक रुग्ण वाढले आहेत.

मुंबईत कोरोनाचे 64,139 रुग्ण आहेत. तर दिल्लीत 53,116 रुग्ण आहेत. पण दिल्लीने तामिळनाडूला मागे टाकलं आणि देशातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक प्रभावित राज्य म्हणून पुढे आली आहे.

18 जून रोजी दिल्लीमध्ये 2,877 रुग्ण वाढले होते. त्यानंतर दिल्ली देशातील दुसरं सर्वात प्रभावित शहर बनलं आहे. त्याच दिवशी दिल्लीपेक्षा चिलीमधील सॅंटियागो येथे 4,421 रुग्ण वाढले. जगातील पाच सर्वात गंभीर शहरांमध्ये चेन्नई आणि मुंबईचा समावेश आहे. पेरुचे लिमा शहरात 18 जून रोजी 1,666 रुग्ण वाढले आणि ते जगातील तिसरे सर्वाधिक प्रभावित शहर बनले.

देशातील एकूण रुग्णांची संख्या आणि एकूण मृत्यू यात दिल्लीचा वाटा अधिक आहे. आतापर्यंत देशातील पुष्टी झालेल्यांपैकी 13 टक्के रुग्ण एकट्या दिल्लीत आहेत. 18 जूनपर्यंत भारतात एकूण 3,81,095 रुग्ण होते. ज्यापैकी 49,979 रुग्ण दिल्लीतील आहेत.

देशांच्या एकूण मृत्यूंमध्ये दिल्लीचा मोठा वाटा आहे. भारतात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 15 टक्के मृत्यू हे दिल्लीतील आहे. 18 जूनपर्यत भारतात 12,606 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 1,969 रुग्णांचा मृत्यू एकट्या दिल्लीत झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button