breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus:जगभरात कोरोनामुळे 4.5 लाख लोकांचा मृत्यू

कोरोना बाधितांची संख्या संपूर्ण जगभरात वेगाने वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या आता 84 लाखांवर पोहोचली आहे. तर साडे चार लाख लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 83 लाख 92 हजार 582 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 50 हजार 452 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 44 लाख लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात जवळपास 62 टक्के कोरोना बाधित फक्त 8 देशांमध्ये आहेत.

कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेमध्ये दिसून येतो. अमेरिकेमध्ये 22 लाखांहून अधिक लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर एक लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु, आता दरदिवशी ब्राझीलमध्ये अमेरिकेहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. तसेच दरदिवशी सर्वाधिक मृतांची नोंदही ब्राझीलमध्ये करण्यात येत आहे. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button