breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus:जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 47 लाखांवर तर 18 लाखांहून अधिक कोरोनामुक्त

मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 47 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. रविवारी सकाळपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा  47 लाख 17 हजार 077 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळं गेलेल्या बळींची संख्या तीन लाख 12 हजारांवर गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 3 लाख 12 हजार 384 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 1,810,099 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 72 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 90,648 रुग्ण, तर 2,871 बळी कोरोनामुळं गेले आहेत.

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,484,004 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 88,485 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 34,466 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 240,161 इतकी आहे.  स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,563 लोकांचा मृत्यू झालाय. 276,505 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 31,763 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 224,760  इतका आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button