breaking-newsTOP Newsमुंबई

कोरोनाचा धडकी भरवणारा वेग, महाराष्ट्रात गेल्या 24 तासात सापडले 1600 नवे रुग्ण

मुंबई | प्रतिनिधी 
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग देखील झपाट्याने वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी महाराष्ट्र, दिल्ली, जयपूर, गुरुग्राम आणि ओडिशामध्ये कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. रविवारी महाराष्ट्रात 1648 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात सध्याच्या घडीला 9,813 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात रविवारी 918 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनामुळे 17 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.12% एवढा आहे. राज्यात सध्या 89,251 रुग्ण हे होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्रात आढळले ओमिक्रॉनचे 31 नवीन रुग्ण

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 31 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबई 27, ठाणे 2, पुणे ग्रामीण 1, अकोला येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. यामध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्क्रीनिंग दरम्यान आढळलेल्या ओमिक्रॉन रुग्णांचा समावेश आहे.यापैकी 4 रुग्ण गुजरातमधील, 3 कर्नाटकातील, 2 रुग्ण केरळमधील आणि प्रत्येकी 1 रुग्ण दिल्ली, छत्तीसगड, यूपी, जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबाद येथील तर 2 परदेशी नागरिक आहेत. या सगळ्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे.सोमवारी मुंबईत तब्बल 922 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत कोरोनाच्या 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 4295 सक्रिय रुग्ण आहेत.

अहमदनगरच्या शाळेत 51 जणांना कोरोनाची लागण

अहमदनगरच्या शाळेतील कोव्हिड-19 रुग्णांची संख्या ही आता 51 वर पोहोचली आहे. त्यामुळे शाळेच्या कॅम्पसला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या ही 51 वर गेली आहे. ज्यामध्ये तब्बल 48 विद्यार्थ्यांचा समावेश आहे, असे आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.काही दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यातील एका निवासी शाळेतील 19 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. या शाळेत 5वी ते 12वी पर्यंत 400 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत.

दिल्लीत मागील 24 तासात सापडले 290 नवीन रुग्ण

दिल्लीत मागील 24 तासात 290 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. येथे संसर्ग दर 0.55% आहे. दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात दिल्लीत 290 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.दिल्लीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,103 आहे. त्यापैकी 583 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ओमिक्रॉन व्हायरसच्या संसर्गामुळे गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या वाढली आहे.जयपूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राजस्थानच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात 46 नवीन रुग्ण आढळले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button