breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोनाचा कहर! दिल्लीत लॉकडाऊन वाढवला

नवी दिल्ली – कोरोनाच्या तीन लाटांचा यशस्वीपणे सामना करणाऱ्या दिल्लीची चौथ्या लाटेने झोप उडवली आहे. एका आठवड्याच्या लॉकडाऊननंतरही राजधानीत कोरोनाचा कहर कायम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली सरकारने लॉकडाऊन एका आठवड्याने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर केजरीवाल सरकारने लॉकडाऊन न लावण्याची भूमिका घेतली होती. मात्र रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्यानंतर रुग्णालयावर अतिरिक्त भार पडू लागला. त्यानंतर सरकारने तातडीने लॉकडाऊन लागू केला होता. त्यानुसार मागील एका आठवड्यांपासून दिल्लीत लॉकडाउन लागू केलेला आहे. मात्र या काळात दिल्लीत रुग्णसंख्येत कोणतीही घट झालेली नाही. उलट ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दिल्लीतील आरोग्य व्यवस्था हतबल झाली आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील लॉकडाऊन एका आठवड्यांनी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पुढील सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत दिल्लीत लॉकडाउन असणार आहे.

‘दिल्लीत कोरोनाचा कहर सुरू असून, त्यामुळे ६ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला होता. आता लॉकडाऊन पुढील सोमवारपर्यंत वाढविण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे पॉझिटिव्ही दरात घसरण झाली असून, दिल्लीत ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवताना दिसत आहे’, अशी माहिती केजरीवालांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button