breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेत ८ नोव्हेंबरपासून लहान मुलांचे कोरोना लसीकरण

वॉशिंग्टन – कोरोना लसीकरणाची वाट पाहणाऱ्या अमेरिकेतील लहान मुलांची प्रतीक्षा आता संपली आहे. येत्या ८ नोव्हेंबरपासून अमेरिकेत लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. लहान मुलांना फायझर लसीचा डोस देण्यात येणार आहे.

अमेरिकी खाद्य आणि औषधी प्रशासनाने शुक्रवारी ५ ते ११ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास आपत्कालीन वापराची परवानगी दिली होती. अमेरिकेच्या सल्लागारांनी एकमताने या निर्णयाचे समर्थन केल्यावर काही तासांनी ही घोषणा झाली. त्यानुसार लहान मुलांसाठी फायझरच्या लसीचा १० मायक्रोग्रामचा डोस अधिकृत केला आहे, तर १२ वर्ष आणि त्याहून जास्त वयाच्या मुलांना ३० मायक्रोग्रामचा डोस देण्यात येणार आहे.

याबाबत राष्ट्रपती जो बायडेन म्हणाले, ‘आज आपण कोरोनाविरोधातील लढाईत एका महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचलो आहोत. अमेरिकेने घेतलेला हा निर्णय लहान मुलांद्वारे दुसऱ्यांपर्यंत विषाणू पसरवण्याची शक्यता कमी करतो. विषाणूला हरवण्यासाठी आपली लढाई म्हणजेच आपल्या देशासाठी एक मोठे पाऊल आहे.’

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button