Uncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

Corona Vaccination: पहिल्यांदा ‘या’ तीन कोटी लोकांनाच कोरोना लस देणार

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. पण सामान्य लोकांना यासाठी वाट पाहावी लागणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार पहिल्या टप्प्यात तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाईल. त्यांच्यानंतर ही लस 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना दिली जाईल.

देशात लसीकरण सुरू होण्यापूर्वी सरकारने ड्राय रन म्हणजेच देशभरात दोनदा लसीकरणाचा सराव घेण्यात आला होता. शुक्रवारीही दुसर्‍या वेळी उत्तर प्रदेश वगळता देशातील प्रत्येक जिल्ह्यात ड्राय रन झाली. इंडिया बायोटेकची कोवॅक्सीन आणि ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची कोविशिल्ड लसीला 3 जानेवारीला आपत्कालीन वापरासाठी मंजूर देण्यात आली होती. कोविशील्डची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केली आहे.

कोरोना लसीसाठी नाव नोंदणीसाठी फोटोसाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, डायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, सेवा ओळखपत्र (फोटोसह) केंद्र/राज्य सरकारद्वारे जारी केलेले पासपोर्ट, आरजीआयने जारी केलेले स्मार्ट कार्ड, टपाल कार्यालय/बँकेने दिलेला पासबुक फोटो आणि कामगार मंत्रालयाच्या आरोग्य विमा स्मार्ट कार्डसह पेन्शन दस्तऐवज आवश्यक असेल. यापैकी कोणतीही कागदपत्रे असल्यास आपण कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करण्यास पात्र असणार आहे. यासह 1075 वर टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button