breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना

मुंबई – राम सेतू चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारपाठोपाठ त्याच्या तब्बल 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व कलाकार राम सेतू चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आहेत. यामुळे या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्णपणे थांबवण्यात आलं आहे.

वाचा :-अक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल

अक्षय कुमारने नुकतेच मुंबईत आपल्या आगामी ‘राम सेतु’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. 5 एप्रिल रोजी एका भव्य सीक्वेन्ससाठी जवळपास 75 ज्युनियर आर्टिस्ट्स आणि इतर लोकांसह ‘राम सेतु’चं चित्रीकरण मुंबईच्या मड आयलंड परिसरात एका भव्य सेटमध्ये होणार होतं. पण चित्रीकरण सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच जेव्हा सगळ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. तेव्हा 75 पैकी 45 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान बरीच सावधानता बाळगण्यात आली होती. चित्रीकरणादरम्यान कोरोना चाचणी करणे गरजेचे करण्यात आले होते. तसेच जरी सेटवर कोणाची तब्येत बिघडली तरी त्यांंना अलगीकरणात ठेवले जात होते. त्याचबरोबर अनेकांना या ठिकाणी पीपीई किट देण्यात आले आहेत. मात्र तरीही अक्षय कुमारसोबत 45 ज्युनिअर आर्टिस्टना कोरोनाची लागण झाल्याने चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. आता जवळपास 13 ते 14 दिवसांनंतर या चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरू होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button