breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळमधील एका कंपनीतील १६१ कामगारांची करोना चाचणी पॉझिटिव्ह

पिंपरी |महाईन्यूज|

मावळ तालुक्यातील पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेलगतच्या एका कंपनीमधील सुमारे १६१ कामगारांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. एकाच गावांतील अनेक कामगार येथे कामाला आहेत. यामुळे संबंधित गावांतही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कंपनीतील ३७५ कामगारांची सोमवारपासून खासगी लॅबमध्ये करोनाची चाचणी करण्यात येत होती. यामध्ये शनिवारपर्यंत १६१ कामगारांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मावळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेंद्र मोहिते, डॉ. संदीप मुंडे, आरोग्यसेवक केतन जाधव, विना धुरंधर, लता वाळुंजकर आदींच्या पथकाने १६१ कामगारांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली आहे. सद्यस्थितीत रुग्णांची स्थिती चांगली असल्याने त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. उर्वरित कामगारांचे अहवाल काय येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, परिसरातील ग्रामस्थांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी आणि सरकारच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button