breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू

कोल्हापूर – कोल्हापूरमधील एका तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मारुती नागोजी पाटील असं या प्राध्यापकाचं नाव आहे. मारुती पाटील हे 38 वर्षांचे होते. सिटी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

कोल्हापूर शहरातील सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसलाय. त्यांच्या पश्चात त्यांचे आई-वडिल आणि लहान परिवार आहे. मारूती यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मारुती नागोजी पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून पीएचडी मिळवली होती. कर्नाटकमधील मणिकेरी हे त्यांचे मूळगाव. पण असं असूनही त्यांनी महाराष्ट्रात स्वतःच शिक्षण पूर्ण केले. त्यांनी इतिहास या विषयात पीएचडी डिग्री मिळवली होती.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून त्यांनी इतिहास विषयात पीएचडी पदवी ग्रहण केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यात असणाऱ्या कौलगे गावात त्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं होतं. सध्या ते कोल्हापूर शहरात प्राध्यापक म्हणून काम करत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button