breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालय ठरलं कोरोना हॉटस्पॉट; 47 विद्यार्थीनी ‘पॉझिटिव्ह’

सांगली | प्रतिनिधी 

राज्यात मंगळवारी आढळून आलेल्या रुग्णसंख्येनं तिसऱ्या लाटेची शक्यता गडद झाली आहे. कोरोना संसर्गाचा वेग वाढला असून, सांगली जिल्ह्यातील मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयातील मुलीचं वसतीगृह कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलं आहे. वसतीगृहातील तब्बल 47 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.

मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहात राहणाऱ्या एका मुलीला त्रास जाणवू लागला. त्यामुळे तिची चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या मुलींच्या चाचण्या करण्याचं काम प्रशासनाने सुरू केलं.

सोमवारी रात्रीपर्यंत 11 मुलींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर इतरही मुलींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात कोरोना झालेल्या मुलींची संख्या मंगळवारी 32 वर पोहोचली होती. मंगळवारी सायंकाळपर्यंत इतर मुलींचे अहवालही प्राप्त झाले.

वैद्यकीय महाविद्यालयात राहणाऱ्या 47 मुलींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. वसतीगृहात राहत असल्याने एकमेकींच्या संपर्कात येऊन कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या सर्व विद्यार्थीनी एमबीबीएसचं शिक्षण घेतात. कोरोनाचा संसर्ग झालेल्या विद्यार्थीनींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रावर तिसऱ्या लाटेचं सावट

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणाकडून प्रयत्न केले जात असतानाच राज्यातील कोरोना रुग्णसंख्येनं उसळी घेतली आहे. राज्यात मंगळवारी 2,172 कोरोना संक्रमित रूग्ण आढळून आले आहेत. अचानक झालेल्या रुग्णसंख्या वाढीने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या असल्या, तरी तज्ज्ञांकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यांप्रमाणे राज्यात तिसऱ्या लाटेची सुरूवात तर झाली नाहीये ना असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

दोन नवीन लसींना आपत्कालीन वापराला परवानगी

देशात कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. लसीकरण कार्यक्रमाला अधिक गती देण्यासाठी सरकारने आणखी दोन लसींचा आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिली आहे. यासोबतच औषधाच्या वापरालाही हिरवा सिग्नल देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने कोवोव्हॅक्स आणि कोर्बिव्हॅक्स या दोन कोरोना लसी तसेच विषाणूविरोधी औषध Molnupiravir च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button