breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

इटलीहून आलेल्या एअर इंडिया विमानात कोरोनाचा विस्फोट, 182 पैकी 125 प्रवाशांना कोरोना

अमृतसर | टीम ऑनलाइन
देशातील कोरोना संसर्ग वाढीचा वेग आता चांगलाच वाढला असून दुसर्‍या लाटेचा विक्रमही मोडित निघाला आहे. ओमिक्रॉनमुळे हा संसर्ग वाढत असून, देशात तिसरी लाट आली आहे, असे सरकारने जाहीर केले आहे. त्यातच आज गुरुवारी इटलीहून अमृतसर येथे एअर इंडियाच्या विमानातून आलेल्या तब्बल 182 प्रवाशांपैकी 125 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. विमानतळाचे संचालक व्ही. के. सेठ यांनी याबाबत माहिती दिली.

पंजाबमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. येथे कोरोना संक्रमण दर 7.95 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णसंख्या 4434 वर पोहोचली आहे. पटियाला, मोहाली आणि पठानकोट जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अधिक खराब झाली आहे. आतापर्यंत 1,69,05,814 लोकांचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यातील 6,08,723 लोकांच्या अहवालात कोरोनाच्या संक्रमणाची पुष्टि केली गेली आहे. 16,657 लोकांचा आतापयर्र्ंत मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने रोज घेण्यात येणार्‍या चाचण्यांची संख्या वाढवून 23 हजार केली आहे. याआधी आरोग्य विभागाकडून 15 ते 17 हजार चाचण्या केल्या जात होत्या. त्यातच आज इटलीहून अमृतसर येथे एअर इंडियाच्या विमानाने 182 प्रवासी दाखल झाले होते. या प्रवाशांची विमानतळावरच कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी केली असता सुमारे 125 प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. या सवार्र्ंना विलगीकरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती विमानतळाचे संचालक व्ही.के. सेठ यांनी दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button