breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

“ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवावं आणि…”, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं आवाहन

पुणे |

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवून तसंच वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचं आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याला प्राधान्य देण्याचे आदेशही यावेळी त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिले आहेत. मंत्रालय येथे वीज बिल व थकबाकी यासंदर्भात बैठक पार पडली. “ग्राहकांना ऑनलाईन व मोबाईल अॅपद्वारे तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.तरीदेखील जे ग्राहक याचा वापर करू शकत नाही त्यांच्यासाठी स्थानिक कार्यालयात ऑफलाईन तक्रारी नोंद करून घेण्याची व्यवस्था करा,” असे निर्देश यावेळी त्यांनी दिले. “करोना काळात रीडिंग न घेता बिलं पाठवण्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत. म्हणून शक्यतो मीटर रीडिंग घेऊनच वीज बिलं पाठवावीत.

करोनामुळे काही वेळा महावितरणला रीडिंग घेणे शक्य होत नसल्याने ग्राहकांनी जर मोबाईल अॅपद्वारे रीडिंग पाठवले तर त्यांना रीडिंगनुसार बिल उपलब्ध करून देता येईल,” असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. “राज्यात वीजेचे दर कमी करण्याठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत असून वीज खरेदी कराराचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. वीज खरेदीसाठी पॉवर एक्स्चेंजमधून दररोज साधारणतः ११०० ते १८०० मेगावॅट वीज विकत घेण्यात येते. पॉवर एक्स्चेंजसोबत दरासंबंधी वेळोवेळी वाटाघाटी करून स्वस्त वीज घेण्याचा प्रयत्न करण्याचे,” निर्देश ऊर्जामंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. “थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या दुर्दैवी घटना घडत असून त्या खपवून घेतल्या जाणार नाही,” असं सांगत नितीन राऊत यांनी महावितरण व प्रशासन हे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं.

वाचा- #Covid-19: १ मे ऐवजी १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस, जो बायडेन यांची घोषणा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button