breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

विधायक उपक्रम: फडणवीस यांच्या वाढदिनी “त्या” मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले!

  •  नगरसेविका सारिका बो-हाडे यांनी केले अनाथ आश्रमात अन्नधान्य व खाऊचे वाटप
  •  भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमांचा ‘धडाका’

पिंपरी | प्रतिनिधी

चिंबळी येथील ॐ शांती अनाथ मुलींच्या आश्रमात भाजापा नगरसेविका सारिका बो-हाडे यांनी अन्नधान्य, बिस्किट आणि खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी येथील ४० मुलींच्या चेहऱ्यावर हसू फुललेले पहायला मिळाले.माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार नगरसेविका सारिका नितिन बो-हाडे यांच्या माध्यमातून चिंबळी येथील ॐ शांती अनाथ मुलीचे आश्रमात अन्नधान्य, बिस्किट व खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी नितिन बो-हाडे , भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी उपाध्यक्ष निलम हुले , अलका वाघोले, बेबीताई सस्ते. सहदेव बो-हाडे .सतिश जरे, विश्वास जैद आदी उपस्थित होते. यावेळी सारिका बोऱ्हाडे म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ॐ शांती अनाथ मुलीचे आश्रमातील मुलींसाठी मी त्यांच्यासाठी खारीचा वाट उचलला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button