breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

#ConstitutionDay: “संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ; पण रोज पायदळी तुडवतात,” संजय राऊतांनी व्यक्त केली खंत

मुंबई |

केंद्र सरकारडून संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज संविधान दिन साजरा केला जाणार आहे. मात्र काँग्रेससहित सर्वच विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. शिवसेनादेखील या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. दरम्यान संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी? अशी विचारणा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

संविधान कार्यक्रमावर तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं असता संजय राऊत म्हणाले की, “मी राष्ट्रवादीविषयी सांगत नाही. विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे. या देशात रोज संविधान पायदळी तुडवलं जातं. देशात संविधानाचं राज्य राहिलेलं नाही. हुकूमशाही पद्धतीने काम सुरु आहे. राज्यघटनेतील अनेक कलमं, खासकरुन राज्याचे अधिकार, संघराज्य व्यवस्था तोडली जात आहे. महाराष्ट्रातसुद्धा संविधानाच्या बाबतीतही राजभवनात काय सुरु आहे हे आपल्याला माहिती आहे. मग संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी?”.

“हा देश संविधानाच्या माध्यमातून चालावा यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीत काही मुद्दे मांडले होते ते महत्त्वाचं आहे. संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ असून गेल्या काही वर्षांपासून रोज पायाखाली तुडवला जात असून अवहेलना केली जात आहे. त्यामुळे सरकारने संविधान दिवस पाळण्याचं जे ठरवलं आहे त्यासाठी विरोधी पक्षाच्या भूमिकेला शिवसेनेचे समर्थन आहे. आम्हीदेखील सहभागी होणार नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे,” असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button