breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

…तर काँग्रेसला १५ जागाही जिंकता येणार नाही; अमरिंदर सिंग यांच्या खासदार पत्नीचा घरचा आहेर

पंजाब |

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदावरुन राजीनामा दिल्यानंतर पंजाबमधील राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. असं असतानाच आता अमरिंदर यांची पत्नी आणि काँग्रेसच्या खासदार परनीत कौरसुद्धा काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अशाचत त्यांनी काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये १५ जागा मिळणंही मुश्कील असल्याचा टोला लगावला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ११७ पैकी १५ जागाही पक्षाला जिंकता येणार नाहीत असा टोला परनीत यांनी लगावल्याचं वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. अमरिंदर सिंग हे एक सैनिक आहेत त्यामुळे या युद्धामध्येही ते नक्कीच विजयी होतील असा विश्वास परनीत यांनी व्यक्त केलाय. कृषी कायद्यांबद्दल परनीत कौर यांनी आंदोलन संपवण्यासंदर्भात अमरिंदर सिंग हे भाजपा सरकारमधील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि लवकरच यासंदर्भातील चांगली बातमी समोर येईल अशी आशा व्यक्त केलीय. शेतकरी आंदोलन हा आगामी काळामधील विधानसभा निवडणुकींमधील महत्वाचा मुद्दा राहणार असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.

परनीत कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार अमरिंदर सिंग हे सध्या कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करत आहेत. सध्या ते पंजाबच्या सुरक्षेसंदर्भातही चिंतेत असल्याचंही त्यांच्या पत्नीे सांगितलं आहे. १९९८ साली पंजाबमध्ये काँग्रेसचा तेव्हा काहीच प्रभाव नव्हता त्या काळी आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी काँग्रेसला राज्यात जनाधार मिळवून दिला. २००२ साली त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्यात काँग्रेसचं सरकार आलं. २०१७ साली पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचं सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला जात असतानाही अमरिंदर सिंग यांच्या पाठीशी पंजाबचे लोक उभे राहिले आणि काँग्रेसचा विक्रमी विजय मिळाला. पतीपाठोपाठ तुम्ही सुद्धा काँग्रेस सोडण्यासंदर्भातील चर्चांना उधाण आल्याचं सांगत प्रश्न विचारण्यात आला असता परनीत कौर यांनी सध्या तरी मी काँग्रेसमध्ये आहे. पुढील गोष्टींबद्दल काँग्रेसच्या नेतृत्वालाच ठाऊक असेल असं म्हणत त्यांनी सविस्तर वृत्तर देणं टाळलं. परनीत कौर यांच्या खासदारकीचा अडीच वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे. मी खासदार असेपर्यंत पतियालामधील लोकांची सेवा करत राहील. काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढत असल्याचं निरिक्षणही परनीत कौर यांनी नोंदवलं. सध्या तरी मला पक्षासाठी चांगलं वातावरण आहे असं वाटतं नाही असं सांगतानाच अमरिंदर सिंग यांच्याशी चर्चा करण्यासाठी कोणत्याही मोठ्या नेत्याचा फोन आला नव्हता असंही त्या म्हणाल्यात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button