breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

काँग्रेसकडून रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी

नवी दिल्ली- काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्‍वासू अशी ओळख असणार्‍या माजी खासदार रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याआधी विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.

रजनी पाटील यांनी उत्कृष्ट संसदपटू म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत होती. मात्र रजनी पाटील यांच्या रुपाने काँग्रेसने पुन्हा मराठवाड्यातील चेहरा दिला आहे. रजनी पाटील या वसंतदादा पाटील यांच्या मानसकन्या असून त्या मुळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत. बीडमधून त्यांनी लोकसभा निवडणुक लढवली होती. राज्यपाल नियुक्त प्रलंबित असलेल्या 12 आमदारांच्या यादीमध्येही त्यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button