Uncategorizedताज्या घडामोडीमुंबईराजकारण

संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांची तीव्र नाराजी

मुंबई: महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याच्या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या व्यक्तव्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीतही यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून यातून सावरण्यासाठी शिवसेनेकडून प्रत्यत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. यातूनच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे समर्थकांना परत येण्याचे आवाहन गुरुवारी केले. हे आवाहन करताना, ‘२४ तासांत आपण मुंबईत या, उद्धव ठाकरे यांच्याशी समोरासमोर बोला. त्यानंतर तुमच्या प्रस्तावावर विचार होईल. तुमची भूमिका असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडायला शिवसेना तयार आहे’, असे वक्तव्य राऊत यांनी केले. राऊतांच्या या वक्तव्यावरून उलट सुलट तर्कवितर्क लढवले जात असून अनेकांनी याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. मात्र हे वक्तव्य एका विशिष्ट परिस्थितीत राऊत यांनी केले असल्याने त्यावर तात्काळ कुणीही थेट प्रसारमाध्यमांमध्ये बोलू नये, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितल्याने याविरोधात जाहीर वक्तव्य करण्याचे काँग्रेस आमदारांनी टाळले आहे.

काँग्रेसमधील अनेक आमदारांनी याविरोधात ‘मटा’शी बोलताना नाराजी व्यक्त केली. संजय राऊत यांनी असे वक्तव्य करायला नको होते. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आहे. काँग्रेसचे सर्व आमदार आणि नेते शिवसेनेच्या पाठीशी उभे आहेत. तशी भूमिकाही काँग्रेस नेतृत्वाने जाहीरपणे व्यक्त केली आहे. असे असतानाही संजय राऊत यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे मत काँग्रेसमधील एका बड्या नेत्याने ‘मटा’शी बोलताना व्यक्त केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीसुद्धा प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दल नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, गुरुवारी संध्याकाळी राज्यातील काँग्रेसचे नेते आणि केंद्रीय नेत्यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीतदेखील राऊतांच्या या वक्तव्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button