आरोग्य विभागाच्या परिक्षेचा गोंधळ, एकाच दिवशी दोन जिल्ह्यांमध्ये पेपर
मुंबई – येत्या 24 ऑक्टोबरला होणार्या आरोग्य विभागाच्या परिक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या परिक्षे संदर्भातील सावळागोंधळ काही थांबायचे नाव घेत नाही. हॉल तिकीटच्या सेेंटरवरून पुन्हा एकदा गोेंधळ झाल्याचे समोर आले आहे. एकाच दिवशी दोन परिक्षांसाठी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांत परिक्षा केेंद्रे विद्यार्थ्यांना आली आहेत. यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत.
गेल्या आठवड्यात होणारी आरोग्य विभागाची परिक्षा ऐनवेळी नियोजन होऊ न शकल्याने पुढे ढकलण्यात आली होती आणि या परिक्षेची तारीख 24 व 31 ऑक्टोबर जाहीर करण्यात आली होती. 24 ऑक्टोबरला होणार्या आरोग्य विभागाच्या परिक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना प्राप्त होत आहेत. यातील काही हॉल तिकिटांमध्ये विद्यार्थ्यांनी दोन वेगळ्या पदांच्या परिक्षेसाठी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांचे परिक्षेचे दोन पेपर एकाच दिवशी आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच परिक्षा केेंद्रात हे दोन पेपर होणे अपेक्षित होते. मात्र दोन्ही परिक्षेचे केेंद्र दोन वेगळ्या जिल्ह्यांत देण्यात आले आहेत.
शिवाय एक सकाळचा परिक्षेचा पेपर सकाळी 10 ते दुपारी 12 दरम्यान तर दुपारच्या दुसर्या परिक्षेसाठीचा पेपर दुपारी 3 ते 5 या दरम्यान आहे. त्यामध्ये विद्याथ्यार्र्ंनी दोन पेपर देण्यासाठी मधल्या दोन ते तीन तासांत दोन जिल्ह्यांमध्ये दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतर पार करणे शक्य नसल्याने हे पेपर एकाच दिवशी कसे द्यायचे असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर काही विद्याथ्यार्र्ंनी अर्ज भरताना पर्याय म्हणून जवळच्या जिल्ह्यातील केेंद्र मिळावे असे नमूद केले होते. तरीही दूरच्या जिल्ह्यांमध्ये विद्याथ्यार्र्ंना परिक्षा केेंद्र देण्यात आली आहेत. याबाबत एका विद्याथ्यार्र्ंने बोलताना सांगितले की, मी राहतो नगर जिल्ह्यात आणि केंद्र आलेय सातारा आणि सांगलीत. मी माझ्या जिल्ह्याला पहिले प्राधान्य दिले असताना परीक्षा केंद्र इतके लांब कसे आले.