breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची परस्पर विरोधी घोषणाबाजी

सांगली |

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पूरपाहणी दौऱ्यावेळी सांगलीच्या हरभट रोडवर निवेदन देण्यावरून गोंधळ माजल्यानंतर शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांनी परस्पर विरोधी घोषणाबाजी केली. पोलिसांनी स्थिती हाताळण्यासाठी सौम्य लाठीमारही केला. भाजपच्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आर्यिवन पुलावर जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर ते पूरग्रस्तांची निवेदन स्वीकारण्यास हरभट रोड येथे थांबले. निवेदन देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती, गुंठेवारी संघर्ष समिती, व्यापारी प्रतिनिधी थांबले होते. या वेळी गोंधळ माजल्याने खाली उतरलेले मुख्यमंत्री ठाकरे परत मोटारीत बसून मार्गस्थ झाले. यामुळे काही कार्यकर्त्यांनी निवेदनाच्या प्रती हवेत भिरकावल्या.

भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत रस्त्यावरच ठाण मांडले. यामध्ये माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक माने, मुन्ना कुरणे आदींचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी परत यावे या मागणीसाठी रस्त्यावरच ठाण मांडले. हा प्रकार सुरू असतानाच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शंभोराज काटकर, मिरज तालुका प्रमुख संजय काटे, विशाल सिंग रजपूत आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याचा प्रयत्न करीत असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले, तर भाजपच्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची सुटका करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button