breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारणविदर्भ

विधानपरिषद निवडणुकीच्या दिवशीच शासनाच्या सहा विभागांची स्पर्धा परीक्षा

स्पर्धा परिक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची युवक काँग्रेसची मागणी

पुणे : विधानपरिषद निवडणुकीच्या दिवशीच 30 जानेवारी रोजी शासनाच्या सहा विभागांची स्पर्धा परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. तरूण उमेदवारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी वेळापत्रकात बदल करण्याची युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन यांनी केली आहे. याबाबत त्यांनी निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला निवेदन दिले आहे.

येणाऱ्या 30 तारखेला पदवीधर मतदारसंघातील निवडणुका आहेत आणि याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहा वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा आहेत यामुळे हजारो विद्यार्थी पदवीधरच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहतील. तरी निवडणूक आयोगाकडून आपण जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला तारखांच्या बाबतीत बदल करण्यास सूचना द्याव्यात असे, अक्षय जैन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघ, नागपूर शिक्षक मतदारसंघ, अमरावती पदवीधर मतदारसंघ, कोकण शिक्षक मतदारसंघ आणि औरंगावाद शिक्षक मतदारसंघ या पाच मतदारसंघात निवडणुक होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button