TOP NewsUncategorizedक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : मीराबाईची सुवर्णझळाळी!; विक्रमी वजनासह राष्ट्रकुल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सोनेरी यश

बर्मिगहॅम | भारताच्या मीराबाई चानूची विश्वातील सर्वोत्तम वेटलिफ्टिंगपटूंमध्ये गणना का केली जाते, याचा शनिवारी पुन्हा एकदा प्रत्यय आला. मीराबाईने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या वेटलिफ्टिंगमधील ४९ किलो वजनी गटात विक्रमी वजनासह सुवर्णपदकाची कमाई केली. हे तिचे राष्ट्रकुलमधील सलग दुसरे, तर भारताचे यंदाच्या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले.

गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या मीराबाईने आपला दबदबा कायम ठेवताना शनिवारी स्नॅचमध्ये ८८ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलो असे एकूण २०१ किलो वजन उचलत सोनेरी यश संपादन केले. तिने स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण वजन या तिन्ही विभागांमधील राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वाधिक वजनाचे विक्रम आपल्या नावे केले.

मीराबाई आणि रौप्यपदक जिंकणाऱ्या मॉरिशसच्या मारीच्या (१७२) एकूण वजनामध्ये २९ किलोचा फरक होता. यावरूनच मीराबाईचे वर्चस्व सिद्ध झाले. तिने स्नॅचमधील तीनपैकी दोन प्रयत्नांत अनुक्रमे ८४ आणि ८८ किलोचे वजन उचलले. तिचा ९० किलोचा प्रयत्न सदोष ठरला. त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये तिने १०९ आणि ११३ किलोचे वजन यशस्वीपणे उचलले. अखेरीस तिला ११५ किलोचे वजन उचलता आले नाही. मात्र, तिने पहिल्या यशस्वी प्रयत्नासह सुवर्णपदक निश्चित केले होते.

वेटलिफ्टिंग

मीराबाईची पदककमाई

साल स्पर्धा   पदक

२०१४   राष्ट्रकुल रौप्य

२०१७   जागतिक अजिंक्यपद सुवर्ण

२०१८   राष्ट्रकुल सुवर्ण

२०२०   ऑलिम्पिक  रौप्य

२०२२   आशियाई अजिंक्यपद कांस्य

२०२२   राष्ट्रकुल सुवर्ण

राष्ट्रकुल स्पर्धेत ४८ किलोपाठोपाठ ४९ किलो वजनी गटातही विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदक आपल्या नावे केल्याने मी खूप आनंदीत आहे. विशेषत: भारताला यंदाच्या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक जिंकवून दिल्याचे मला जास्त समाधान आहे. माझी स्वत:शीच स्पर्धा आहे, असे मी मानत होते. या सुवर्ण कामगिरीचा मला खूप आनंद आहे.

– मीराबाई चानू

गुरूराजाला कांस्य

वेटलिफ्टिंगपटू गुरूराजा पुजारीने पुरुषांच्या ६१ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. २०१८च्या राष्ट्रकुलमध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या गुरूराजाने एकूण २६९ किलो (११८ किलो + १५१ किलो) वजन उचलले. त्यामुळे त्याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मलेशियाच्या अझनिल बिन बिदिन मुहम्मदला सुवर्ण (२८५ किलो) आणि पपुआ न्यू गिनीने रौप्यपदक (२७३ किलो) कमावले.

बॉक्सिंग

हसमुद्दीनची आगेकूच

भारताचा बॉक्सिंगपटू मोहम्मद हसमुद्दीनने पुरुषांच्या फीदरवेट (५७ किलो) गटाची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. २०१८च्या राष्ट्रकुलमध्ये कांस्यपदक कमावणाऱ्या हसमुद्दीनने दक्षिण आफ्रिकेच्या अमझोलेले डायेयीचा ५-० असा पराभव केला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button