TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तसाहेब, प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे चिमुकल्याने जीव गमावला

  •  बेफिकीर अधिकारी, बिल्डर यांच्यावर कारवाई करून अदनानच्या कुटुंबियांना न्याय द्या
  •  चिखली मोशी पिंपरी चिंचवड सोसायटी हाउसिंग फेडरेशनची मागणी

पिंपरी | प्रतिनिधी

चिखली येथील ऐश्वर्यम् हमारा या गृहप्रकल्पांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरखाली चिरडल्याने तीन वर्षीय मुलाचा शुक्रवारी मृत्यू झाला. टॅंकरने पाणीपुरवठा करताना सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले गेले नाही. त्यामुळे हकनाक चिमुरड्याला जीव गमवावा लागला. मूलभूत गरज असलेले पाणी व्यवस्थितरित्या उपलब्ध होत नसेल तर या गृह प्रकल्पाला पूर्णत्वाचा दाखला मिळालाच कसा असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकाराची सखोल चौकशी आयुक्त राजेश पाटील आपण जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करणार का असा सवाल चिखली मोशी पिंपरी चिंचवड सोसायटी हाउसिंग फेडरेशनच्या वतीने करण्यात आला आहे.

चिखली येथील ऐश्वर्यम हमारा सोसायटीमध्ये टँकरने पाणी पुरविण्याचे काम शुक्रवारी सुरु होते. दुपारी बारा वाजताच्या सुमारास टँकरने अदनान शमशुद्दीन मणिहार (वय 3, रा. ऐश्वर्यम हमारा सोसायटी, चिखली) या मुलाला टँकरने चिरडले.त्यातच त्या मुलाचा मृत्यू झाला.

या निमित्ताने चिखली मोशी पिंपरी चिंचवड सोसायटी हाउसिंग फेडरेशनच्या वतीने आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. ज्यामध्ये अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी म्हंटले आहे की, चिखली येथील ऐशर्यम हमारा या बांधकाम प्रकल्पाला महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाची पहाणी न करता, सर्व गोष्टी चेक न करता, कोणतेही ना हरकत दाखले न तपासता बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिलेला आह., तसेच या प्रकल्पाच्या विकासकाने पिंपरी चिंचवड मनपाने बांधकामाचा परवाना देते वेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती पाळलेल्या नाहीत.बांधकामाचा दर्जा ठीक नाही, तसेच सुरक्षेचे कोणतेही नियम पाळलेले नाहीत, येथे राहणाऱ्या
सदस्यांनी आमच्या फेडरेशनकडे केलेली आहे. तसेच अशीच तक्रार आपल्याकडे देखील केलेली आहे.

बांधकाम प्रकल्प, या प्रकल्पांमध्ये नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधा याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली. या प्रकल्पामध्ये पाणीपुरवठा होत नसल्यानेच टँकरचे पाणी पुरवावे लागत आहे. आणि याच मुळे हकनाक एका चिमुरड्याचा बळी गेला आहे. ही बाब
खूप गंबीर स्वरूपाची असल्याने आपण तात्काळ या तक्रारीची दखल घेऊन, याची पूर्ण चोकशी करून यात तथ्य आढळल्यास आपल्या ज्या अधिकाऱ्यांनी बांधकाम प्रकल्पास बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिलेला आहे त्यावर योग्य ती कारवाई करावी तसेच सदर गृहप्रकल्पाच्या विकसकावर देखील कारवाई करून अदनान याच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा अशी मागणी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button