पिंपरी / चिंचवड

मावळमधील नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांना सुरुवात: भूमिपूजनाचा मान महिलांना

– पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन महिलांच्या हस्ते

– आमदार सुनील शेळके यांचा महिला सन्मानाचा आदर्श

पिंपरी l प्रतिनिधी

आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यात विकासकामांचा धडाका चालू आहे. ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत मावळमधील घोणशेत, माऊ आणि वडेश्वर येथील नळ पाणीपुरवठा योजनांचे नुकतेच भूमिपूजन झाले. या भूमिपूजनाचा मान आमदार सुनील शेळके यांनी महिलांना दिला. आमदार शेळके यांनी हा महिला सन्मानाचा उत्तम आदर्श घालून दिला आहे.

भूमिपूजन सोहळ्यासाठी जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, माजी सरपंच सुप्रिया मालपोटे, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस रंजना सातकर, अधिका तनपुरे, राजश्री शिळीमकर, आशा डुंबरे, मावळ तालुका कुंभार समाज मंडळ अध्यक्षा शुभांगी दरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अतिश परदेशी, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायण ठाकर, युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, माजी सरपंच दत्तात्रय पडवळ, देविदास गायकवाड, घोणशेतचे सरपंच अंकुश खरमारे, उपसरपंच लक्ष्मीबाई पालवे, सदस्य रुपाली गरुड, कविता चोरघे, मनिषा राक्षे, गजानन खरमारे, पोलीस पाटील मोनिका कचरे, रोहिदास गरुड, सोमनाथ राक्षे, बाळासाहेब गरुड, मारुती राक्षे, दत्तु गरुड, रमेश जाचक, भरत कचरे, माऊ-वडेश्वर ग्रामपंचायत सरपंच छाया हेमाडे, उपसरपंच माऊली जगताप, सदस्य कुंदा मोरमारे, सुरेखा शिंदे, हेमांगी खांडभोर, रुपाली सुपे, मनिषा दरेकर, वासुदेव लष्करी, दत्ता चिमटे, शिवराम शिंदे, निलेश साबळे, ज्येष्ठ नेते शांताराम जगताप, माजी सरपंच गुलाब गभाले, उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस बाबाजीशेठ दवणे, अध्यक्ष आदिवासी सेल विक्रम हेमाडे, अनंता हेमाडे, आनंदा जगताप, मच्छिंद्र जगताप, तुकाराम चव्हाण, भरत लष्करी, भरत कशाले, गणेश मोरमारे आदि उपस्थित होते.

विकासकामांचे भूमीपूजन महिलांच्या हस्ते करण्यात आले. हा महिला भगिनींना मान आहे. ख-या अर्थाने हा स्त्री शक्तीचा सन्मान असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

या योजनांमुळे घोणशेत परिसरातील वाऊंड, कचरेवाडी, लंकेवाडी, देशमुखवाडी, खरमारेवाडी, माऊ येथील मोरमारेवाडी, डोंगरवाडी, गभालेवाडी, दवणेवाडी आणि वडेश्वर येथील शिंदेघाटेवाडी, सटवाईवाडी, लष्करवाडी या वाड्या वस्त्यांवर घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असल्यामुळे प्रत्येक घरापर्यंत पाणी देण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button