ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

खान्देश मराठा पाटील समाज संघाचा शनिवारी गुणगौरव सोहळा

पिंपरी | खान्देश मराठा पाटील समाज संघाच्यावतीने गुणगौरव सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १९ मार्च २०२२ रोजी खंडोबा मंगल कार्यालय (खंडोबा माळ), आकुर्डी येथे सायं. ६ वाजता गौरव सोहळा पार पडणार आहे. कार्यकमावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार असून मान्यवरांना विविध पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. खान्देशी अभिनेता सचिन कुमावत आणि अभिनेत्री पुष्पा ठाकूर यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम या सोहळयाचे विशेष आकर्षण असणार आहे.

खासदार श्रीरंग आप्पा बारणे, खासदार अमोल कोल्हे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, माजी सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, सहा. पोलीस आयुक्त विजय चौधरी (महाराष्ट्र केसरी), माजी शिवसेना गटनेता राहुल कलाटे, माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, राजेंद्र साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महिलांसाठी हळदी – कुंकू कार्यक्रम, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यासारखे विविध उपक्रम संघाच्यावतीने दरवर्षी आयोजित केले जातात. सदर कार्यक्रमाला मोठया संख्येने पिंपरी,चिंचवड, भोसरी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button