आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिलासादायक! शहरात एकही मृत्यू नाही; 48 नवीन रुग्णांची नोंद,53 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. गेल्या अनेक दिवसानंतर शहरात आज कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. शहराच्या विविध भागातील 48 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 53 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आजपर्यंत शहरातील 4 हजार 506 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 77 हजार 173 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 387 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 179 रुग्ण गृहविलगीकरणात असून 203 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 19 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 250 आहेत. आज दिवसभरात 10 हजार 597 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 24 लाख 97 हजार 285 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button