breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

डिजिटल तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापराद्वारे नागरिकांना पायाभूत सेवा-सुविधा मिळणार- महापौर उषा ऊर्फ माई ढोरे

पिंपरी चिंचवड |

नागरी प्रशासनामध्ये समाजाला केंद्रस्थानी ठेवून आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रशासनाला नवे आयाम प्राप्त करून देण्याकरीता पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक प्रकल्प् राबविण्यात येत आहेत. महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना राहण्यासाठी सुखकर ठरतील अशा पायाभूत सेवा- सुविधा अनेक संसाधनांच्या वापराद्वारे आगामी काळात शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या एबीडी व पॅन सिटी प्रकल्पांच्या कामांचा दि. ०६ व ०७ जानेवारी २०२२ हा संचालक मंडळाचा दोन दिवसीय पाहणी दौरा महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात होता. या दौ-याच्या दुस-या दिवशी पॅन सिटीच्या डिजिटल प्रकल्पांची प्रगती व माहिती जाणून घेण्यासाठी निगडी येथील इंटीग्रेटेड स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सिस्टीम सेंटरला संचालक सदस्यांनी भेट दिली. यावेळी, सत्तारुढ पक्षनेते तथा संचालक श्री. नामदेव ढाके, जैवविविधता समिती अध्यक्षा श्रीम. उषा मुंढे, नगरसेवक तथा संचालक श्री. सचिन चिखले, सह मुख्य कार्यकारी अध‍िकारी श्री. निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता (दूरसंचार) श्री. थॉमस नरोन्हा, माहिती व तंत्रज्ञान अध‍िकारी विजय बोरुडे, प्रोग्रॅम मॅनेजर श्री. चंद्रकांत देशपांडे, श्री. नितीन बियाणी, ऑपरेशन हेड सुजित वानखेडे यांच्यासह महापालिका अध‍िकारी- कर्मचारी उपस्थ‍ित होते.

सुरुवातीला सह मुख्य कार्यकारी अध‍िकारी श्री. निळकंठ पोमण यांनी प्रकल्पांची माहिती दिली. इंटीग्रेटेड स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सिस्टीमच्या सहाय्याने स्मार्ट पर्यावरण व्यवस्थापन, स्मार्ट वाहनतळ व्यवस्थापन, स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन, स्मार्ट जल व्यवस्थापन (चांगले पाणी आणि प्रदूषित पाणी), स्मार्ट समुदायांचे व्यवस्थापन, स्मार्ट महानगरपालिका व्यवस्थापन, स्मार्ट परिवहन व्यवस्थापन इत्यादी स्मार्ट सिटीशी संबंधित घटकांशी संपर्क साधणे व त्यांचे मूल्यमापन करून सिटी ऑपरेशन सेंटरची रचना करण्यात येते. त्याद्वारे संपूर्ण कामकाजाचे तटस्थतेने निरीक्षण केले जात असून डॅशबोर्डच्या माध्यमातून आयसीसीसीमधील प्रत्येक घटकाचे लाईव्ह स्टेटस समजत असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्तारुढ पक्षनेते श्री. नामदेव ढाके म्हणाले, शहरासाठी एक सुसज्ज वायफाय व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण शहर जोडले जाईल. या सुविधेमुळे डिजिटल किऑस्क्स, डिजिटल मॅसेज साईन बोर्ड्स, स्मार्ट मीटर्स, स्मार्ट बिन्स, स्मार्ट पोल्स, स्मार्ट इमर्जन्सी (कॉम्प्युटर एडेड डिस्पॅच) वाहने आणि शहरातील रहिवासी या सर्वांचा समावेश असलेल्या इकोसिस्टीमला सक्षम करता येणे शक्य आहे. ही विशिष्ट डिजिटल इकोसिस्टीम शहरातील पायाभूत सुविधांचा कणा ठरेल, त्यासाठी ही कार्यपध्दती लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

श्री. सचिन चिखले म्हणाले की, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील मोकळी जागा आणि वाहनतळ यांचे योग्यप्रकारे व्यवस्थापन झाले पाहिजे. शहरातील वाहतुकीची गुणवत्ता सुधारावी, याकरीता स्मार्ट मोबिलिटीच्या माध्यमातून प्रयत्न करून नागरिकांसाठी ई-स्कूटर आणि ई-बाईक असे पर्याय उपलब्ध करून देऊन वाहतुकीचे व्यवस्थापन करता येईल. पिंपरी चिंचवड शहरातील महत्वाच्या ठिकाणी वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सिटी सर्व्हेलन्समध्ये गुन्ह्यांचे नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, व्हीडीओ विश्लेषणावर आधारित गर्दीचे व्यवस्थापन, फेशिअल रिकग्निशन सिस्टीम, व्हिडीओ मॅनेजमेंट सिस्टीम, स्वयंचलित नंबर प्लेट आणि रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन सिस्टीम या सर्वांचा समावेश असल्याने हा प्रकल्प नागरिकांसाठी उपयुक्त् ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्मार्ट घनकचरा व्यवस्थापनामध्ये आयसीटीच्या पायाभूत सुविधा वापरून शहरामध्ये निर्माण झालेल्या घन कचऱ्याचे व्यवस्थापन केले जाते. याद्वारे विघटनशील आणि अविघटनशील कचऱ्याचे वर्गीकरण संकलन, कचरा संकलक वाहनाचे स्थान, बिन सेन्सर डेटा, उपस्थितीची माहिती, अलर्ट आणि विविध घटना यांची रिअल टाईम माहिती देणारी यंत्रणा, कचरा संकलन करणाऱ्या वाहनाचे ट्रॅकींग, आयसीटी पायाभूत सुविधांच्या सहाय्याने उत्कृष्ट कार्यप्रणाली असल्याने हा प्रकल्प पर्यावरणासाठी महत्वाचा ठरणार असल्याचे जैव विविधता समितीच्या अध्यक्षा श्रीम. उषा मुंढे यावेळी म्हणाल्या.
ऑटोमेशन आणि मनुष्यबळाद्वारे केली जाणारी कामे आणि प्रक्रिया नियंत्रित करणे, विविध संस्थांबरोबर एकत्र काम करणे, समस्या सोडविणे, माहितीचे रिअल टाईम विश्लेषण, जनजागृती आणि प्रतिसाद या कार्यपद्धतीद्वारे लोकांचा सहभाग करून घेणे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने प्रतिसाद आणि आपत्ती व्यवस्थापन, शासकीय व्यवस्थांमध्ये सुलभता आणणे, योग्य वाहतूक नियंत्रण आणि व्यवस्थापन, शहराच्या आरोग्याशी संबंधित परिस्थितीचे यथायोग्य विश्लेषण, सुरक्षितता आणि कायद्याच्या अंमलबजावणी, आयसीटीच्या पायाभूत सुविधांमध्ये डेटा सेंटर, क्लाऊड, नेटवर्क, सुरक्षा आणि शहरातील विविध सेवांशी जोडले जाण्यासाठी आवश्यक असणारे हार्डवेअर, नागरिककेंद्री सेवा, स्मार्ट सिटी अॅप्स आणि वेब पोर्टल, स्मार्ट सुविधा आणि माहिती देणारे इन्फॉर्मेशन डिस्प्ले याबाबत पदाधिका-यांनी माहिती जाणून घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button