Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडा

धारणी तालुक्यातील ब्लास्टिंगच्या स्फोटामुळे नागरिकांने आपले हात गमवावे लागले

अमरावतीः धारणी पोलिस स्टेशन अंतर्गत आठ किलोमीटर अंतरावरील कळमखार येथील रहिवाशी मधू रामू गायकवाड वय ३५ वर्ष या तरुणाने आपल्या राहत्या घरी मॅगझीनचा स्फोट (गावठी बॉम्ब) करुन आत्महत्या केली.

मधू रामू गायकवाड हे मजूरी करत होते. त्यांना दोन मुली आणि दोन मुले असे एकूण चार अपत्य आहेत. मधू हे १५ ऑगस्टपासून मानसिक तणावाखाली दिसत होते. पत्नीसोबत वाद झाल्याने त्यांची पत्नी शेजारी राहत असलेल्या आई- वडिलांच्या घरी राहत होती. मधू घरात एकटाच झोपला होता त्यानंतर अचानक त्याने ब्लास्टिंग मॅगझिनचा स्फोट करून आत्महत्या केली. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

रात्री मोठा आवाज झाल्याने परिसर मधील नागरिक भयभीत झाले होते. मोठा आवाज कसला हे पाहण्यासाठी त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. मधू गायकवाड यांच्या घराजवळ येताच गावकऱ्यांना मोठा धक्का बसला.

मधूने गळ्यात मॅगझिन बांधून मग आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्यात त्याच्या शरीराचे तुकडे आवारात विखुरलेले दिसले. घटनेची माहिती धारणी पोलिसांना देण्यात आल्याने धारणीचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग महापुरे, प्रमोद बाळापुरे, धर्माडे यांनी पंचनामा करुन मधूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धारणी येथे पाठविला आहे.

दरम्यान या पूर्वीही धारणी तालुक्यातील ब्लास्टिंगच्या स्फोटामुळे माशांची शिकार करताना परिसरातील अनेक नागरिकांने आपले हात गमवावे लागले. ब्लास्टिंगचे मॅगझिन कुठून येतात व त्याची विक्री कोण करते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याची सखोल तपास करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button