breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू; नवी नियमावली

मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे पुन्हा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता पण आता लोकांचे मनोरंजन पुन्हा सुरू होणार आहे. अखेर २२ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उघडण्याचा आणि इतर महत्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

‘ब्रेक द चेन’अंतर्गत नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असून राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने त्यासाठी नवी नियमावली जाहिर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार, प्रतिबंधित क्षेत्रातील नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी नाही. तसेच मास्क आणि सॅनिटासझरचा वापर बंधनकारक आहे. कलाकार आणि कर्मचाऱ्यांनी नियमित तपासणी करणे बंधनकारक आहे. आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. तसेच, ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेचा वापर करण्याची परवानगी नसणार आहे. सर्वांना आरोग्य सेतू अँपचा वापर बंधनकारक आहे. कलाकार आणि प्रेक्षक सर्वांचे लसीकरण पूर्ण असणे बंधनकारक आहे. कलाकारांना कक्षात जाऊन भेटण्याची परवानगी नाही. केशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्यांनी पीपीई कीट परिधान करणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन करणे सर्वांसाठीच बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारादेखील देण्यात आला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button