breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

तळवडेत जल्लोषपूर्ण वातावरणात ‘चिल्ड्रेन्स फनफेअर’

  •  माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांचा पुढाकार
  •  भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

पिंपरी । प्रतिनिधी

तळवडे येथे आयोजित ‘चिल्ड्रेन्स फनफेअर’ची जल्लोषपूर्ण वातावरणात सुरूवात करण्यात आली. फनफेअरमध्ये तब्बल २ हजार ५०० हून अधिक मुलांनी सहभाग नोंदवला. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात मोठी लहान मुलांच्या मॅरेथॉनलाही परिसरातील मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच बालदिनाचे औचित्य साधून तळवडे येथील माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी ‘चिल्ड्रेन्स फनफेअर’ चे आयोजन केले होते.

यामध्ये प्रामुख्याने रन फॉर फन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्यात तब्बल २५०० मुलांनी सहभाग नोंदविला. पिंपरी-चिंचवड शहरातील ही सर्वात मोठी लहान मुलांमुलींची मॅरेथॉन स्पर्धा ठरली असून, उत्साही मुलामुलींनी रेकॉर्डब्रेक हजेरी लावली. विविध ८ फेऱ्यांच्या माध्यमातून अतिशय खेळीमेळीच्या व जल्लोषपूर्ण वातावरणात स्पर्धा पार पडली. प्रत्येक फेरीतील मुले व मुली विजेत्यांना सायकल, टॅब तसेच घड्याळे बक्षिसे देण्यात आली. झुंबा डान्सचा आस्वाद घेत लहानग्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. लहानांपासून अगदी ज्येष्ठापर्यंत सर्वांनीच या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. त्यानंतर दुपारी चित्रकलेची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातही तब्बल १ हून ४०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुनांची झलक दाखविली. या स्पर्धेतील विजेत्यांनाही सायकल, टॅब व घड्याळ अशी बक्षिसे देण्यात आली.

तसेच, पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन कार्यांत आले होते यातही ऐतिहासिक आकर्षक वेशभूषा परिधान करून लहान मुलामुलींनी यात सहभाग घेतला. महात्मा गांधी, छत्रपती शिवराय, बाबासाहेब आंबेडकर, महाराणी येसूबाई, सावित्रीबाई फुले अशा विविध आदर्श व्यव्क्तीमत्वांचे वेष परिधान करून त्यांचे लहान मुलांनी या स्पर्धेचा आस्वाद घेतला. यातही विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. सोबतच बालजत्रेचे आयोजन केल्याने इथेही लहान मुलांनी मजा व धमाल अनुभवली. याच चिल्ड्रेन्स फनफेअर २०२१-२२ ची पुढचे पर्व येत्या रविवारीही (दि. २८ नोव्हेंबर) आयोजन करण्यात आले आहे.

  • तळवडेवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

खास लहान मुले व मुलींसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अभूतपूर्व असा उत्स्फूर्त प्रतिसाद तळवडेवासीयांनी दिला. या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धा, आकर्षक बक्षिसे तसेच बालजत्रा, खाऊ गल्ली व विविध खेळांची मेजवानीच बच्चेकंपनीसाठी आयोजित करण्यात आली होती.

  • बच्चे कंपनीसाठी सिंहगड सफर…

लहान मुलांना छत्रपती शिवरायांचे विचार तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांचा अतुल्य पराक्रम थेट ऐतिहासिक सिंहगड सफरच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे. या सिंहगड सफर साठी तब्बल २ हजार लहान मुलामुलींनी आतापर्यंत नावनोंदणी केली आहे. तळवडे परिसरात आयोजित आजवरचा हा सर्वात मोठा अभूतपूर्व असा कार्यक्रम ठरला असून सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button