पिंपरी / चिंचवड
आळंदी येथील अलंकापुरी मंगल कार्यालयात बालविवाह; अल्पवयीन मुलावर गुन्हा
पिंपरी l प्रतिनिधी
आळंदी येथील अलंकापुरी मंगल कार्यालय येथे एका अल्पवयीन मुलाने स्वताचा एका मुलीसोबत विवाह केला. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या विरोधात बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बालविवाहातील वधूच्या वडिलांनी शनिवारी (दि. 26) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने फिर्यादी यांच्या मोठ्या मुलीसोबत 17 मार्च रोजी दुपारी एक वाजता आळंदी येथील अलंकापुरी मंगल कार्यालयात हिंदू धर्म वैदिक पद्धतीनुसार विवाह केला. हा विवाह बालविवाह प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा होत असल्याने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.