पिंपरी / चिंचवड

एसटी चासीच्या धडकेत मुलाचा मृत्यू

पिंपरी l प्रतिनीधी

दापोडी येथील एसटी वर्कशॉप जवळ एसटी चासीच्या धडकेत नववीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 15) सकाळी घडली.

अनिकेत दीपक शिंदे (वय 15, रा. राजर्षी शाहू महाराज कॉलनी, दापोडी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. चालक ज्ञानेश्वर तुकाराम जावळे (रा. औरंगाबाद) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनिकेत हा नृसिंह हायस्कुल सांगवी या शाळेत नववीत शिक्षण घेत होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने तो लॉकडाऊन पासून घरच्यांना मदत करण्यासाठी तो सकाळच्या वेळी वर्तमान पत्रांचे सांगवी परिसरात वितरण करत असे. तर शाळा झाल्यानंतर दुपारच्या वेळी वायरिंगचे काम करत असे.

अनिकेतची आजपासून परीक्षा सुरू होती. सकाळी तो वर्तमान पत्रांचे वितरण करून आला. पहिलाच पेपर असल्याने तो आणि त्याचा लहान भाऊ संकेत (वय 12) सोबत शाळेत निघाला होता. दापोडी येथील एसटी वर्कशॉपजवळ एसटी चासी घेऊन चालक ज्ञानेश्वर जावळे जात होता. चासीच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. अनिकेत आणि संकेत दोघेजण हातात हात घालून शाळेत जात होते. त्यावेळी चासीने धडक दिली. संकेतने हात झटकल्याने तो वाचला आणि अनिकेत चासीच्या चाकाखाली आला.

लहान भाऊ संकेत आठवीमध्ये तर मोठी बहीण बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. आई धुण्याभांड्याची कामे करते तर वडील मोलमजुरी, मिळेल ते काम करतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button